गुणवंत पाटील हंगरगेकर यांची कृषी मुल्य आयोगाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सत्कार 

हिंगोली येथील शेतकरी संघटनेच्या वतीने आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी संत नामदेव कॉटन मार्केट यार्ड येथे गुणवंत पाटील हंगरगेकर यांची कृषी मुल्य आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती झाली असून त्यांचा आज शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

नांदेड येथे राहणारे शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत पाटील हंगरगेकर मागील अनेक वर्षांपासून ते शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पदावर कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारच्या वतीने गुणवंत पाटील हंगरगेकर यांची कृषी मुल्य आयोगाच्या सदस्य नियुक्त करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संत नामदेव कॉटन मार्केट येथील सभागृहात शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविप्रसाद ढोबळे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव वाबळे, अ.णा. पातुरकर, शेतकरी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. अंजली पातुरकर, खंडबाराव नाईक, ब.ल.तामसकर , महावीर सोनी, शेषराव राखुंडे, भरत तांबिले, महादराव चव्हाण, भाऊराव शिंदे, केशव ढोबळे, बबन ढोबळे, साहेबराव नागरे, गोरख पाटील,बंडू कऱ्हाळे, व्ही.डी.शिरपुरकर , मुरलीधर कदम, शेषराव कदम, परबतराव माने, व्यंकटी भुमरे, गणेश चव्हाण यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.