त्या पंरप्रातीय युवकांचे अपहरण करणाऱ्या एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पाचोड पोलीसांना यश!

पाचोड(विजय चिडे) पाचोडच्या आठवडी बाजारातून एका सतरा वर्षीय युवकांस एका कारमध्ये मध्ये (दि.३१)रोजी दुपारीच्या सुमारास मुकेश राजाराम निगवाल वय (१७)रा.ढोलकट  ता. नेपानगर जि.बऱ्हाणपूर मध्यप्रदेश असे अपहरण करण्यात आलेल्या युवकाचे नाव होते. या युवकासचे अपहरण झाल्याची तक्रार पाचोड पोलिस ठाण्यांत दाखल होतांच सपोनि गणेश सुरवसे,पो.उपनि.सुशात सुतळे,पो.उपनि.सुरेश माळी यांची तपासचे चक्रे फिरवून त्या युवकास चोवीस तासांमध्ये शोधून काढले होते मात्र आरोपी पसार झाले होते.यातील कार चालकांच्या बीड येथून मुसक्या आवळण्यात पाचोड पोलिसांना यश आले असून गणेश बनकर त्याचे नाव आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की,पाचोड ता.पैठण येथील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबी तोडणीच्या कामासाठी परप्रांतीय कामगारांचे कुटुंबीय मोठ्या प्रमाणात येतात.त्यामुळे मुकेश निगवाल हा देखील पहिल्यांदाच रोजगारासाठी येथे आला. त्याने सकाळी केश कर्तनालयात जाऊन कटींग केली.त्यानंतर तो आठवडे बाजारात फिरायला गेला बाजारातून परत मोसंबीमार्केटकडे येत असतांना त्यावेळी तो एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसतांना   मोसंबी मार्केटातील काही परप्रांतीय कामगारांना दिसला त्यांना वाटले की तो बसस्थानकापर्यत बसून उतरला परंतु तो तिथ उतरला नाही तर त्याचे अपहरण झाल्याचे समजतात त्यांचीतील एका साथीदारांने या संदर्भात पोलिस ठाण्यांत तक्रार दिली होती. त्यानंतर चोविस अपहरणकर्ते यांचा चोवीस तासामध्ये शोध लावून अपहरण झालेली व्यक्ती मुकेश राजाराम निगवाल वय (१७)रा.ढोलकट ता. नेपानगर जि. बऱ्हाणपूर मध्य प्रदेश यास सुखरुप सोडविण्यात आले मात्र,यातील अपहरणकर्ते हे फरार झाले होते.तेव्हा पासुन पाचोड पोलिसांकडून वेगात तपास सुरु केला होता.तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी निष्पन्न करण्यात यश आले असुन एका आरोपीस बीड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.