२ लाखाचा गुटखा, ३ लाखाचे वाहन जप्त

औसा प्रतिनिधी -लातूर जिल्ह्यातील जळकोट लातूरच्या अन्नसुरक्षा अधिकारी यांनी जळकोट पोलीस ठाण्यासमोरच बंदी असलेला पानमसाला गुटखा व वाहन असा एकूण ५ लाख ८२ हजार ३६० रूपयांचा माल जप्त करून एका विरोधात गुन्हा दाखल केला.शेख जुनेद हमीद (वय १९) रा. जळकोट रोड उदगीर हा जळकोट पोलीस ठाण्याच्या समोर एम. एच. ०३ - बीएच-४६६४ या क्रमांकाच्या कारमध्ये बंदी असलेला पानमसाला किंमत २ लाख ८२ हजार ३६० रुपये यासह मिळून आला म्हणून अन्नसुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे यांच्या फिर्यादीवरून जळकोट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.