चित्रा गवारे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

( शिक्रापूर प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सन २०२१- २०२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जिल्हा परिषदेच्या शाळा लाडबा पडळ (लोणी काळभोर) ता.हवेली येथील उपक्रमशिल शिक्षिका सौ.चित्रा अजय गवारे यांना राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

                        मुंबई (वांद्रे) येथील रंगशारदा सभागृहात राज्य स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी दूरदृष्टी प्रणालीद्वारे शिक्षण मंत्री दिपक केसरकर, शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, राज्य शिक्षण परिषद संचालक कौस्तुभ दिघेगावकर, राज्य प्रकल्प संचालक शिक्षण परिषद श्री कैलास पगारे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्ण कुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदिप संघवे आदिसह विविध मान्यवर उपस्थित होते.शिक्षण आयुक्त श्री सुरज मांढरे यांचा शुभेच्छा संदेश यावेळी देखील वाचून दाखविण्यात आला.

     सौ.चित्रा गवारे यांनी प्राथमिक विभागात अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. चला स्वाध्याय करू यात, स्वअभिव्यक्ति, समृध्दीतून गुणवत्तेकडे हा उपक्रम घेऊन शाळा ISO करण्यात मोलाचा वाटा उचलला. कोरोना काळात एकही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहू नये यासाठी त्यांनी वाडी-वस्तीवर शिक्षण प्रत्यक्ष पोहचवले.कृतीयक्त व स्तर निहाय शिकण्याची संधी असे अनेक शैक्षणिक उपक्रम राबवून शाळेचा भौतिक व बौद्धीक विकासास योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२१-२०२२ प्रदान करण्यात आला.

     सौ.चित्रा गवारे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांवरुन अभिनंदन केले जात आहेत.