शिरुर मध्ये होणार मंगलदास बांदल यांची भव्य पत्रकार परिषद
( शिक्रापूर प्रतिनिधी ) पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल सध्या कारागृहातून बाहेर आलेले असून पुढील रणनीती ते रविवारी जाहीर करणार असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल एका बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी तब्बल बावीस महिने कारागृहात होते, बावीस महिन्यांनी ते कारागृहाबाहेर आलेले असून त्यांनी आपल्या भागातील अनेक ठिकाणी सार्वजनिक व खाजगी कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र बांदल यांच्यावर गुन्हे दाखल होण्याचे काही दिवस आधी त्यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पदावरुन पत्र काढत हकालपट्टी करण्यात आलेली होती त्यांनतर बांदल यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नव्हता, मात्र आता कारागृहातून बाहेर आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी कामाला लागले मात्र बांदल सध्या कोणत्याही पक्षात नसताना आता ते काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना आता रविवारी २६ फेब्रुवारी रोजी मंगलदास बांदल शिरुर येथे पत्रक्र परिषद घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले असून आता बांदल काय गौप्यस्फोट करणार आणि राजकारणातील कोणती रणनीती आखणार तसेच कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार कि अपक्ष पद्धतीने निवडणुकीला सामोरे जाणार याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.