अकोला दिनांक 25 फेब्रुवारी 2023

मध्यप्रदेशामधून आलेल्या ऊसतोड मजुराची बीड प्रशासनाने मुकादमाच्या कचाट्यातून केली सुटका. टाकरवन येथे ऊसतोड मुकादमाने कर्नाटक जिल्ह्यातील आदिवासी ऊसतोड मजुरांना तीन महिन्याचा करार करून ऊसतोड कामासाठी आणले होते , साखर कारखान्याचा पट्टा पडल्यानंतरही मुकादम ऊसतोड मजुरांना त्यांच्या गावी परत जाण्यास नकार देत होता , ऊसतोड मजुरांनी मुकादमांना  कामाचा हिशोब मागितला तर हिशोब देत नव्हता , उलट ऊसतोड मजुरांना टोळी उचलून मनाविरुद्ध ऊसतोड कामाला लावत असे हा मुकादम त्यांच्याकडून बळजबरीने काम करून घेत होता. मुकादमाचे नाव गोपीनाथ पवार राहणार टाकरवन याबाबतची तक्रार बीड जिल्ह्याचे कामगार उपायुक्त मुंडे साहेब यांना समजली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन कर्मचारी तहसीलचे प्रभारी अधिकारी तहसीलदार प्रशांत जाधवर पुरवठा विभागाचे अधिकारी श्रीमान नामदेव खेडकर तसेच मानवी हक्क संघटनेचे अधिकारी आदरणीय कडूूदास कांबळे सर यांनी ऊसतोड मजुराची सुटका केली ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवून दिले आपल्या गावी परत जाताना मजुराच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.