पैठण नजीक कार दुचाकीच्या अपघातात दोघे ठार
पाचोड/
भरधाव वेगातील मारुती झेन कारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची दुर्घटना पैठण पाचोड राज्य महामार्गावरील कापसाच्या जिनिंग जवळ बुधवारी दि,२२ दुपारी घडली. शमशुद्दीन अंसारी वय ( ३०) रा. मनिर मिया पुरहरा हजारीबाग झारखंड आणि प्रकाश कान्होंजी गवळी रा. मुकुंदवाडी औरंगाबाद असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहेत.
या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, जिओ कंपनीचे दावरवाडी परिसरात वायर टाकण्याचे काम सुरू आहे.या कामावर हे दोघे जण कामागार म्हणून कामाला होते कामानिमित्त ते पैठणला गेले होते.तिकडचे कामे आटोपून पैठणहून दुचाकी क्रमांक एमएच २० एफटी २९८ वरुन पाचोडच्या दिशेने जात होते. दरम्यान कापसाच्या जिनिंगवर जवळ येताच त्यावेळी पाचोडकडून पैठणकडे भरधाव वेगात येणाऱ्या मारुती झेन कार क्रमांक एमएच २० बीएन ९८१४ ने समोरुन दुचाकीला जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघे जण रस्त्याच्या पलीकडे खड्यात जाऊन फेकले गेले तर कारही देखील रस्त्याच्या पलीकडे खाली जाऊन खड्ड्यात उलटली या दुर्घटनेत डोक्यासह हात फायाला जबर मार लागल्याने शमशुद्दीन अंसारी आणि प्रकाश गवळी हे जागीच ठार झाले या अपघाताची माहिती रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन धारकांनी पोलीसांना दिली.ही माहिती कळताच पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल पा. नेहुल,सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भालेराव, सफौ राजू गोल्डे, राघुडे,गरड आदीनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णवाहिकेतून पैठणच्या शासकीस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. रस्त्याच्या पलीकडे गेलेल्या दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले आहे.या अपघाताची नोंद पैठण पोलीस ठाण्यात करण्यात करण्यात आली.
संग्राहित फोटो-