शिक्रापूर पोलिसांकडून दहशत माजवणाऱ्यांची धिंड
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार वेगवेगळे गुन्हे करून तसेच वेगवेगळे हत्यार वापरून त्याचे व्हिडिओ तयार करून इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर प्रसारित करून दहशत माजवणाऱ्या आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी एका गुन्ह्यांमध्ये अटक केली असता पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, लखन शिरसकर, अशोक केदार यांसह आदींनी विकी उर्फ विवेक उर्फ दाद्या राजेश खराडे, आदित्य नितीन भोईनल्लू, आदिन जैनोद्दीन शेख या तिघा आरोपींची शिक्रापूरातील मुख्य चौकातून तसेच कॉलनी, वेगवेगळ्या शाळा महाविद्यालय परिसरातून धिंड काढली आहे. तर याबाबत बोलताना नागरिकांना त्रास देऊन दहशत पसरवणाऱ्यांची शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गय केली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले.