अकोला दिनांक 20 फेब्रुवारी 2023 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

परिवर्तन युवक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती व पुण्यतिथी बाबतची नोंद शासकीय परिपत्रकामध्ये घेण्याची मागणी परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी भारत देशाकरिता जे सामाजिक आणि राजकीय कार्य केले आहेत ते अविस्मरणीय आहे यांनी पुणे शहरांमध्ये पहिला आखाडा उभारून देशात मोठ मोठाले तरुण तयार केले आहे त्यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठा सहभाग आहे त्यावेळी समाज रचना विषमतेवर असताना त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता समाज हितासाठी समाजकार्य केले आहे त्यांनी त्यावेळेस म्हटले आहे की जगेन तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी या तत्त्वावर संपूर्ण आयुष्य देश कल्याणार्थ वाहून घेतले आहे तरीसुद्धा अशा या महामानवाची दखल आतापर्यंत कोणत्याच शासनाने घेतली नसून ही लाजिरवाणी बाब आहे म्हणून अशा या महामानवाची जयंती व पुण्यतिथी शासन परिपत्रकामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयात त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी परिवर्तन युवक संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रफुल साठे तसेच प्रवक्ते घनश्याम शिंदे सर उपाध्यक्ष प्रवीण चोपडे सर आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.