दिनांक 15 फेब्रुवारी 2023 या दिवशी श्री संत सेवालाल महाराजांची जयंती सर्व शासकीय व निम शासकीय कार्यालयात साजरी करण्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलेले आहे.

क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. आज रोजी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यातील गोलाल डोडी हे त्यांचे गाव होते आता त्या गावाला सेवागड नावाने ओळखतात. सर्व भारतातील बंजारा समाज त्यांना आपले आध्यात्मिक गुरु मानतात ते जगदंबा मातेचे परम शिष्य होते. ते आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेत. त्यांनी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी व त्यांच्या कल्याणकारी विचाराची स्थापना केली .समाजाला दिशा दाखविण्याचे महत्त्वाचे कार्य केले. सेवालाल महाराज यांचे श्री क्षेत्र रुईगड यवतमाळ जिल्हा येथे निधन झालेले आहे .महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड या गावी त्यांची समाधी आहे. श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोंडा घाट या ठिकाणी ऊसतोड मजूर समस्त बंजारा समाजाच्या वतीने प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी उपस्थित मुकादम रूपचंद राठोड, विठ्ठल आडे ,अनिल पवार ,सचिन साठे ,प्रल्हाद राठोड ,अर्जुन कांबळे उपस्थित होते .