बीड दि.06 (प्रतिनिधी) - समस्यांची जाण असावी,हातात सत्ता असावी, कामकरणारी यंत्रणा सक्षम असली की,विकासाचे स्वप्न साकार होते ही नव्या काळाची गुरुकिल्ली डॉ. यौगेश क्षीरसागरांना सापडली आहे. हीच गुरुकिल्ली यौगेश पर्व साकार करेल.याची परीचिती जव्हेरी गल्ली, गुरुनानक मंदिर येथे झालेल्या विकास कामांच्या बैठकीत दिसून आली.समाज,देश,जग बदलत आहे .या काळात राजकारण ही बदलत आहे. काळाची पावले ओळखून चालणारी माणसे जग बदलू शकतात हेच डॉ. यौगेश क्षीरसागरांनी दाखवून दिले आहे.बीड वार्ड क्रमांक सात येथे पाहणी करण्यात आली. धोंडीपुरा भागातील जव्हेरी गल्ली येथे आयोजित छोटेखानी बैठकीस युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे झालेली आहेत. राहिलेली कामे येत्या काही दिवसांत पूर्ण करू असे सांगितले तसेच आपण ज्या काही समस्या सांगितल्या आहेत त्या लवकरच मार्गी लावू असा विश्वास दिला. यावेळी बाळासाहेब पिंगळे, मा.नगरसेवक राजेंद्र काळे, गोपाळ गुरखुदे, बाळासाहेब जाधव, सुशिल पिंगळे, रुपेश यादव, आशिष काळे, राहुल गुरखुदे, शैलेश गिरी, अथर्व काळे यांच्यासह परिसरातील नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.