संगमेश्वर : कोंडअसुर्डे गावचे सुपुत्र अथर्व पोवले यांना विश्व समता कलामंच लोवले (संगमेश्वर तर्फे) राज्यस्तरीय 2022-23 चा विश्व समता प्रेरणा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला. यावेळी मंचावर पालकमंत्री उदय सामंत साहेब, माजी आमदार उदय बने साहेब,खासदार विनायक राऊत व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.
अथर्व पंकज पोवले सध्या सिटी हायस्कूल सांगली येथे इयत्ता 7वी मध्ये शिकत आहेत. तबला वाद नाचे शिक्षण घेत आहेत.आणि शालेय विविध स्पर्धेत रौप्य आणि कास्य पदके आता पर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यास सौ. हेमांगी बापट मॅडम यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे. तसेच पालकांचे सुद्धा मार्गदर्शन मिळत आहे.
"छोटीसी बात" या लघुचित्रपटात शिव या नावाची भूमिका त्यांनी साकारली आहे.या निमित्ताने श्री. सत्यवान जाधव (मौजे असुर्डे)यांच्या शुभ हस्ते कु. अथर्व ला पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाल, पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार केला.सोबत मान्यवर सामाजिक कार्यकर्ते राजेश शिंदे,माजी सैनिक पाल्य दिनेश आंब्रे, श्री. शरद बेलवलकर,श्री. प्रमोद पोवले,सौ. प्रमोदिनी पोवले,अ.भा. वि. प चे माजी कार्यकर्ते देवदल पोवले उपस्थित होते.