पशुसंवर्धन विभागामार्फत बियाणे वाटपाकरिता लाभार्थी निवडीसाठी 15 फेब्रुवारी रोजी सोडत

औसा प्रतिनिधी -जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षीक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत दुभत्या जनावरांसाठी खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम या योजनांतर्गत बियाणे वाटप करण्यात येणार आहे. 

या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्यांकडून यापूर्वी तालुकास्तरावर अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जांमधून लाभार्थ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. यासाठी 15 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी तीन वाजता लातूर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कक्षात सोडत होणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.