परतुर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रास्त भाव दुकानदाराचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन..

.===========...=======

परतूर प्रतिनिधी हनुमान द वंडे

परतुर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर रास्त भाव दुकानदार संघटना परतुर यांच्या वतीने विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे.रास्त भाव दुकानदार संघटनेच्या वतीने अन्नधान्य वाटप करताना शासनाकडून सद्यस्थितीत कमी प्रमाणात कमिशन देण्यात येते. सदरचे कमिशन स्वस्त धान्य दुकानदार यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे कठीण झाले आहे. तसेच ई.पास मशीन मध्ये स्वतंत्र तांत्रिक अडचणी असल्यामुळे ग्राहकाचा नाहक रोज सहन करावा लागत आहे. व स्वस्त धान्य दुकानामधील अन्नधान्य वाटप करण्यासाठी दोन ते तीन मजूर लागतात तसेच शासनाकडे येणारे कमिशन हे सुद्धा वेळेवर मिळत नाही या सर्व बाबींचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र शासनाने देशातील वैयक्तिक नावावरील रेशनिंग परवाने महिला बचत गट व अन्य स्थानिक संस्थांना देण्याच्या घेतलेल्या निर्णयास विरोध करण्यात येत आहे. स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मार्जीन (कमिशन )मध्ये वाढ करण्यात यावी. व वर्ल्ड फुड प्रोग्रामच्या शिफारसी त्वरित स्वस्त धान्य दुकानदारांना लागू करण्यात याव्या त स्वस्त धान्य दुकानदाराला एक टक्के घट मंजूर करण्यात यावी. अन्य मागण्याही मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी रास्त भाव दुकानदार संघटना परतुर यांनी केली आहे . यावेळी उपस्थित राजाराम रंगनाथराव कांबळे स्वस्त भाव दुकानदार संघटना सचिव परतुर ,नामदेव भगवानराव तनपुरे तालुका अध्यक्ष प्रकाश परतूर, कोंडीबा साळवे उपाध्यक्ष, सुकलाल राठोड ,संघटक गणेश भगवानराव हनवते ,सहसचिव अंकुश बिडवे, सदस्य गोविंद काळे , आदी स्वस्त धान्य दुकानदार उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करत आहेत.