पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर ता. शिरुर येथील पाटवस्ती येथे जुन्या वादातून एका युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आल्याची घटना घडली असून यामध्ये सिद्धेश संजय शेलार या युवकाचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विकी खराडे सह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

                                      शिक्रापूर ता. शिरुर येथील विकी खराडे व सिद्धेश शेलार या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता, त्या वादाचा राग विकीच्या डोक्यात असल्याने त्याने त्याच्या दोन साथीदारांना सोबत घेऊन सिद्धेश शेलार हा सोमवारी रात्रीच्या सुमारास घरी जात असताना त्याला अडवून कोयत्याच्या सहाय्याने त्याच्या डोक्यावर, हातावर गंभीर वार केले, दरम्यान सिद्धेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडला, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, वैभव पवार, नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस हवालदार शंकर साळुंके, संदीप कारंडे, पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, अशोक केदार, लखन शिरसकर, निखील रावडे, किशोर शिवणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले, पोलिसांनी जखमी सिद्धेश शेलार यास रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी सिद्धेश संजय शेलार रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. चर्मकार गल्ली पारनेर ता. पारनेर जि. अहमदनगर याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले, शिक्रापुरात खुनाचा प्रकार घडताच शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनी घटनास्थळाला भेट देत पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या, घडलेल्या घटनेबाबत भूषण उत्तम शेलार वय २८ वर्षे रा. चर्मकार गल्ली पारनेर ता. पारनेर जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विकी शेलार सह त्याचे दोन अनोळखी साथीदार ( पूर्ण नाव पत्ते माहित नाही ) यांच्या विरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे करत आहे.

 

खुनानंतर सोशल मिडियावर धमकीचा व्हिडीओ . . . . . . . . .

शिक्रापूर येथे खून करणारा विकी खराडे याने खुनाच्या घटनेनंतर त्याच कोयत्याचा स्वतः सोबत व्हिडीओ टाकत आता तरी केला फक्त वार पुन्हा कोण नादाला लागला तर आता करेल गोळीबार असा धमकीवजा व्हिडीओ प्रसारित केला आहे.

 

.