द वर्ड स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

औसा( प्रतिनिधी)-शहरातील द वर्ड स्कूल इंडिया नाथनगर, औसा येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश देशमुख, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ तथा अध्यक्ष ,लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणूनराम कापसे, शिक्षण विस्तार अधिकारी, औसा देशमाने सर, केंद्रप्रमुख औसा,सानप साहेब पोलीस निरीक्षक, औसा, सौ. फुटाणे मॅडम, शिक्षण विभाग, औसा ,प्रा. ज्योती पाटील-भोसले संचालिका, द वर्ल्ड स्कूल, गणेश पाटील,कृषी अधिकारी उपस्थित होते.

            विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सोलार सिस्टिम, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा ,वायू प्रदूषण, ज्वालामुखी , मानवी पचन संस्था, रस्ते सुरक्षा उपकरणे, भु-स्थिर उपग्रह, चंद्रग्रहण सूर्यग्रहण, जमिनीचे भूस्तर ,वातावरणाचे विविध स्तर इत्यादी माहितीपूर्ण असे प्रकल्पाचे सादरीकरण केले होते व मोठ्या आत्मविश्वासाने प्रकल्पांची माहिती विद्यार्थी देत होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना पाहुणे कापसे सर यांनी विद्यार्थ्यांनी सादर केले.