लग्नाचे आमिष दाखवून पस्तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार; तरुणावर गुन्हा

---------------------------------------------------------- 

    पाचोड ,) लग्नाचे आमिष दाखवून सलगरित्या दहा महिन्यापासून पस्तीस वर्षीय विवाहितेवर शारिरिक संबंध प्रस्थापित करून तिचेवर बलात्कार करणाऱ्या विवाहित तरुणावर पाचोड (ता .पैठण) पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची घटना मंगळवारी (ता.३१) रात्री घडली .

 यासंबंधी अधिक माहिती अशी, घोटन (ता. शेवगाव) येथील तीन अपत्याची आई असलेल्या पस्तीस वर्षीय महिलेची पाचोड येथे अमोल पुंजाराम गायकवाड रा. लिंबगाव (ता.पैठण) या दोन अपत्याचा बाप असलेल्या तरुणासोबत काही कामानिमित्त भेट होऊन ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सदर महिला प्रेमापोटी सदर महिला पती व मुलाला सोडून येथेच आपल्या आईकडे राहु लागली. मे 2022 मध्ये अमोल यांने सदर महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्या महिलेने अमोल यास वेळोवेळी तु लग्न कधी करणार असे विचारले असता तो नंतर करु असे खोटे आश्वासन देवुन त्यांने तिचे सोबत वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. पंधरा दिवसापुर्वी सदर महिला अमोल यास लग्न कधी करणार आहे असे विचारण्यास गेली असता त्यांने तिचेसोबत लग्न करणार नसल्याचे सांगून तिला शिवीगाळ केली व तु परत माझेकडे आली तर तुला जिवे मारुन टाकीन अशी तिला धमकी दिली. अमोल गायकवाडने लग्नाचे आश्वासन देऊन शारीरीक संबंध ठेवून मे 2022 पासुन तिचे इच्छेविरुध्द धारकर यांचे शेतात वेळोवेळी बलात्कार केला अशा आशयाची तक्रार सदर महिलेने अमोल गायकवाड याचे विरूद्ध दिल्यावरून पोलिसांनी सदर महिलेचा इन कॅमेरा जवाब नोंदवून अमोल गायकवाड विरुद्ध बलात्कार व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंध कलमान्वये मंगळवारी (ता.३१) सायंकाळी सव्वासात वाजता गुन्हा दाखल केला .

         याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी डॅा. विशाल नेहूल, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे करीत आहे