आष्टी वंचित बहुजन आघाडी आष्टी तालुका नूतन कार्यकारणी गठीत करण्यासाठी आज शासकीय विश्रामगृह आष्टी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष उद्धवजी खाडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महासचिव ज्ञानेश्वरजी कवठेकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जोगदंड यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आज संपन्न झाली.    

यावेळी जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे बोलताना म्हणाले की पक्ष संघटन बळकट करून पक्षाचे विचार तथा बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरां याचे जे धोरण आहेत की शेकडो वर्षापासून सत्तेतून वंचित असलेला समूह अशा समूहाला सत्तेची दार उघडी करून देण्याचे जे धोरण आहे या धोरणाची माहिती तथा पक्षाची विचारधारा अधिका अधिक लोकांपर्यंत पोहोचवावे आणि वेळप्रसंगी समाजातील लोकांच्या मदतीला वंचित बहुजन आघाडीचे सैनिक म्हणून धावून जावे.

या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर कवठेकर हे बोलताना म्हणाले की वंचित बहुजन आघाडी आष्टी तालुका नवीन होणाऱ्या कार्यकारणी मध्ये सर्व समाजातील युवकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी पक्षाच्या वतीने देण्यात येणारा आहे त्यामुळे सर्व आष्टी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,या बैठकीला शेषेराव घुगे, किरण आखाडे, सोनू जाधव, सुहास पगारे, संतोष खंडागळे, खंडू खेत्रे, कमलेश जाधव, अशोक निकाळजे अविनाश जाधव व मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीचे सूत्रसंचालन किरण आखाडे केले तर आभार प्रदर्शन सुरज निकाळजे यांनी केले