जि.प प्रशाला नागरसोगा येथे ग्रंथालय आपल्या दारी उपक्रम

औसा प्रतिनिधी - तालुक्यातील जि.प प्रशाला नागरसोगा येथे ग्रंथालय आपल्या दारी उपक्रम नागरसोगा -ग्रंथालयातील पुस्तके चार भिंतीतच मर्यादित राहिली तर ज्ञानालाच बंदिस्त केल्यासारखे होईल उगवत्या पिढीला व शालेय विद्यार्थ्यांनाही आपल्या नियमित अभ्यासाबरोबरच वाचन संकृती रुजावी आणि विविध विषयांवरील ग्रंथ वाचून प्रशासनात उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री प्रकाश जाधव यांनी केले. औसा तालुक्यातील नागरसोगा येथील कै. देवीशिंग चौहान सार्वजनिक वाचनालय नागरसोगा च्या वतीने ग्रंथालय शाळेच्या दारी उपक्रम जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नागरसोगा येथे शुक्रवारी घेण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच श्रीमती सरोजाताई सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागरसोगा नगरीचे ग्रां प सदस्य भास्करराव सूर्यवंशी हे होते. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यशवंतराव सूर्यवंशी, ग्रंथपाल संत्राम माळी, बालाजी चौहान,प्रशालेतील शिक्षक श्रीधर चौधरी, इनामदार, अरूण लेंडोळे,मिनल कोव्हाळे,काकसाहेब फडणीस, माधुरी भुरे, प्रतिभा बनसोडे, श्रीम उषा घोडके इ उपस्थित होते.