प्रमोद क्षिरसागर शिक्रापूरचे नवे पोलीस निरीक्षक

( शिक्रापूर प्रतिनिधी ) पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या असताना प्रमोद क्षिरसागर यांची शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली असून शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांची यवत पोलीस स्टेशन येथे नव्याने नेमणूक करण्यात आली आहे.   

                              पुणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जानेवारी महिन्यात बदल्या होणार असल्याचे बोलले जात असताना नुकतेच पोलीस स्टेशनचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांसह काही इतर अधिकाऱ्यांसह पुणे जिल्ह्यातील दहा पोलीस निरीक्षकांच्या तर पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी जाहीर केलेल्या असताना आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षिरसागर यांची शिक्रापूर येथे नेमणूक करण्यात आली आहे. नव्याने नेमणूक झालेले अधिकारी त्यांचे ठिकाणी व बदलीचे ठिकाण पुढीलप्रमाणे

पोलीस निरीक्षक दिलीप शिशुपाल पवार आर्थिक गुन्हे शाखा ते इंदापूर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक नारायण विनायक पवार यवत पोलीस स्टेशन ते जुन्नर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक हेमंत गणपत शेडगे शिक्रापूर पोलीस स्टेशन ते यवत पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक राजकुमार बालाजी केंद्रे आर्थिक गुन्हे शाखा ते खेड पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक विकास अहिलप्पा जाधव जुन्नर पोलीस स्टेशन ते जिल्हा विशेष शाखा, पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षिरसागर आळेफाटा पोलीस स्टेशन ते शिक्रापूर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक यशवंत कृष्णा नलावडे सुरक्षा शाखा पुणे ते आळेफाटा पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक संतोष दिनकर जाधव नियंत्रण कक्ष ते सुरक्षा शाखा पुणे, महिला पोलीस निरीक्षक वैशाली रावसाहेब पाटील नियंत्रण कक्ष ते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पुणे, पोलीस निरीक्षक विजयसिंह भगवानसिंह चौहान अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष पुणे ते डायल ११२ विभाग पुणे तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोमलसिंग राउळ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन ते उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा कार्यालय, सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास हिरालाल करंडे उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा कार्यालय ते लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन विठ्ठलराव कांडगे सायबर पोलीस स्टेशन ते ओतूर पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव चंद्रकांत शेलार नियंत्रण कक्ष ते स्थानिक गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन संतराम काळे स्थानिक गुन्हे शाखा ते वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्या सह पोलीस निरीक्षक प्रभाकर माधव राव मोरे बारामती तालुका पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब नारायण पाटील दौंड पोलीस स्टेशन व सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम नारायण साळुंके यांची वालचंदनगर पोलीस स्टेशन या अधिकाऱ्यांची सध्याच्या नेमणूक ठिकाणी कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे, अशा प्रकारे पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आलेल्या असून प्रत्येकाने तातडीने नवीन नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देखील पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिले आहे.