माजलगाव, : - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक अंबाजोगाई येथील नामफलकाची अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली असुन त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी मल्हार सेनेच्या वतीने दि.५ आँगस्ट रोजी जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. ३ ऑगस्ट २०२२ बुधवार रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अंबाजोगाई येथील चौकातील डिजिटल नामफलकाची काही अज्ञात समाज कंटकांकडून विटंबना करण्यात आली. सदर घटना ही सामाजिक तेढ निर्माण करणारी असून, समाजाचा उद्रेक होउ नये यासाठी प्रशासनाने याचा तपास करून समाजकंटकांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा मल्हार सेना व ओबीसी महासंघाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे जिल्हाधिका-यांना देण्यात आला आहे. निवेदनावर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराव डोणे, ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास नेमाणे, संतोष दादा देवकते उपसरपंच राज अर्जुन, किशोर इके, आप्पासाहेब तायडे, बाळु चौरे, सुभाष गवळी अशोक चोरमले, यांच्या स्वाक्ष-या आहेत.