बीड -गेवराई तालुक्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सिरसमार्ग- तरटेवाडी- काळेवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ११ पैकी ६ जागा मिळवुन, वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपाने पाच जागा पटकावल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत पॅनलचा दारुण पराभव झाला, या पॅनलला एकही जागा मिळाली नाही.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

 गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग ग्रामपंचायत निवडणुकीत तीन पॅनल व काही अपक्ष मैदानात उतरल्याने, निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. गुरुवारी येथे ८१ टक्के मतदान झाले होते. गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. सिरसमार्ग ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली माजी सभापती पांडुरंग कोळेकर, माजी सरपंच सोमेश्वर गंचाडे यांच्या संतुआई ग्रामविकास परिवर्तन पॅनलने ६ जागा मिळवून, दणदणीत विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे मीनाक्षी सोमेश्वर गंचाडे, दैवशाला नारायण कोळेकर, राजकन्या लक्ष्मण कोळेकर, सीमा सुरेश मार्कड, विनोद नवनाथ चव्हाण, नितीन रामभाऊ लिंगे हे उमेदवार विजयी झाले तर पंचायत समितीचे सदस्य अनिल पवळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या पॅनलने चांगली लढत देत,११ पैकी ५ जागा पटकावल्या. या निवडणुकीत भाजपा पॅनलचे मेघाताई अनिल पवळ, भक्ती भगवान सागडे, गोकुळ तुकाराम जाधव, विश्वंभर रामकिसन रडे, सोनाली शाम वखरे हे उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती पांडुरंग कोळेकर यांच्या सुनेचा वॉर्ड क्रंमाक एकमधुन पराभव झाला. दिनेश गुळवे, भारत कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुरस्कृत पॅनलला एकही जागा मिळाली नाही. मागील पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनलचा पराभव झाला होता. यावर्षी पांडुरंग कोळेकर, सोमेश्वर गचांडे यांनी अतिशय चांगले नियोजन करुन, प्रचार यंत्रणा राबविल्याने, ग्रामपंचायत ताब्यात आली. नारायण कोळेकर, सुरेश मार्कड यांना निवडणुकीत मतदारांनी कौल दिला. निकालानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावात जल्लोष साजरा केला.