औसा प्रतिनिधी - स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा सर फाऊंडेशन ‘नॅशनल टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०२२’ देशभरातील अनेक प्रयोगशील शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांना जाहीर झाला आहे. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी, अन्य शिक्षणप्रेमी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार या आठ राज्यांतील शिक्षकांचा विजेत्यांमध्ये समावेश आहे अशी माहिती सर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयक हेमा शिंदे, बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर फाऊंडेशनने शिक्षण विषयक अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. रवि जे मथाई सेंटर फॉर एज्यूकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था (आय.आय.एम.) अहमदाबाद, हनी बी नेटवर्क, सृष्टी अहमदाबाद, डाएट व शालेय शिक्षण विभाग यांच्या सोबत विविध उपयुक्त उपक्रम प्राथमिक शिक्षणासाठी राबविले आहेत.
सर फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२२’ मधून या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ‘नवोन्मेष’ या प्रकल्पांतर्गत हे अवॉर्ड जाहीर करण्यात आले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर तज्ज्ञ कमिटीमार्फत ही निवड केली जाते.
या पुरस्काराचे वितरण मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या विशेष ‘एज्युकेशनल इनोव्हेशन्स कॉन्फरन्स’ मध्ये होईल. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ‘कॉन्फरन्स’ मध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे. शिक्षणतज्ज्ञांचे व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे.
यात लातूर जिल्ह्यातील प्राथ.गटात श्रीमती पवार कौशल्या-अहमदपूर,श्री भूतापल्ले गोपाळ-लातूर,श्री हूडगे प्रमोद -चाकूर,श्रीमती पुरी रचना -औसा,श्रीमती आगलावे वर्षा-लातूर, श्रीम.संगीता चिट्टे-जळकोट
*माध्यमिक गट*
श्रीमती वडजे प्रभावती- उदगीर, श्री चांदुरे संभाजी-निलंगा,श्रीमती खडके अनिता
*इतर* गट
दहिफळे मुकुंद- डायट मुरुड,श्री. रेणके दत्तात्रेय ,लातूर
यांचा समावेश आहे.
या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पालघर जिल्हा समन्वयक राजन गरुड, शिल्पा वनमाळी, आनंदा आनेमवाड आणि लातूर जिल्हा समन्वयक डॉ.सतिश सातपुते, शोभा माने यांनी मेहनत घेतली. या पत्रकार परिषदेला सर फाऊंडेशन आयटी विभागप्रमुख राजकिरण चव्हाण, गुणवंत चव्हाण उपस्थित आदी होते.