पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे प्रा. प्रताप भोसले.
औसा (प्रतिनिधी ): श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयात डी.फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिये नंतर विध्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी चन्ना बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रा. प्रताप भोसले, सांगवे जी.बी. संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे, संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्यामलीला बावगे (जेवळे). इत्यादी प्रमुख पाहुणे व्यासपीठावर उपस्थित होते . प्रास्ताविक पर भाषण प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे)यांनी केले.
तंत्रज्ञानाच्या डिजिटल युगामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत असताना मोबाईलचा वापर करीत असले तरी आपली मुले मुली शिक्षण घेत असताना मोबाईलचा कशा पद्धतीने वापर करतात यावर सर्व काही अवलंबून आहे विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश दिल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष ठेवणे व अधून मधून महाविद्यालयास भेट देणे गरजेचे असल्याचे प्रा. प्रताप भोसले पालक मेळाव्यात बोलत होते .
हासेगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये लातूर कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठीचे दालन उभे केले आहे. दरवर्षी नामांकित कंपन्यांकडून कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले जाते या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक विध्यर्थ्याना नौकरीची संधी उपलब्ध करून दिले. अत्याधुनिक यंत्रसामग्री सह 17 प्रयोगशाळा सुसज्ज असून या सर्व शैक्षणिक साधनसामग्रीचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग अभ्यासद्वारे करून आपले करिअर निर्माण केले पाहिजे, आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करणे आवश्यक आहे डिजिटल क्लासरूम youtube च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध केले आहे अशी माहिती संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे यांनी पालक मेळाव्यात दिली. .
या कार्यक्रमाला लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर . लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी ,हासेगाव , राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था , गुरुनाथ अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल , लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,लातूर , या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विध्यार्थी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा बालाजी खवले यांनी केले .