लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

   औसा प्रतिनिधी- श्री शिक्षण संस्था संचलित ,लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये "साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी" आशा राजमाता जिजाऊ माँसाहेब व राष्ट्रीय युवक दिन म्हणून स्वामी विवेकानंद या दोन थोर व्यक्तीची जयंती साजरी करण्यात आली, या जयंतीनिमित्त प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, कोशाध्यक्ष शिवलिंग जेवळे,सचिव वेताळेश्वर बावगे ,संचालक नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला, एसव्हीएसएस लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. वीरेंद्र मेश्राम यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प माला अर्पण करण्यात आले, यानिमित्त फार्मसी, फिजिओथेरपी आणि सायन्स या महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते , सर्वांन प्रतिमेचे विनम्र अभिवादन केले.