औसा: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष व युवासेनेत असंख्य तरूणांचा वाढता प्रतिसाद,युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत.युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांचा युवासेनेत प्रवेश घेण्यात आला,दिनेश जावळे हे जिल्हाप्रमुख झाल्यानंतर औसा निलंगा शिरूळ अंतपाळ देवणी या मतदारसंघातयु वासेना जोमात कामाला लागली आहे.दिनेश जावळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा बैठकीत हजारो तरुण सहभागी होताना दिसुन येत आहेत.औसा मतदारसंघ हा मुळात शिवसेनेचा बाल्ले किल्ला म्हणून ओळखला जाईचा.पण युती मध्ये असतेवेळी हा मतदारसंघ भाजप ला सोडण्यात आला आणि तिथला आमदार भाजपचा झाला.पण ती खंत नेहमी कट्टर शिवसैनिकांचा मना मध्ये कायम असल्यामुळे.यावेळी शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कडे तालुक्याच्या शिवसैनिकांनी हा मतदारसंघ परत आपणाला मिळावा.यासाठी मागणी केली आहे अस समजतय.आणि हि मागणी पक्षप्रमुखांनी सुध्दा मान्य करून,तुम्ही कामाला लागा आपण परत हा मतदारसंघ ताब्यात घेऊ अस आश्वासन दिल आहे.त्यामुळे युवासैनिक सुध्दा त्याच जोमाने आणि जिद्दीने काम करताना दिसुन येत आहेत.भविष्यात औसा व निलंगा या दोन्ही मतदारसंघात शिवसेना आपली ताकद दाखवून विरोधकांना खिंडीत पकडण्याची तयारी करत आहे.तालुक्याच्या बहुसंख्य गावा मध्ये शाखा अनावरन तथा प्रवेश घेऊन,तिथल्या सामान्य प्रश्नाला वाच्या फोडण्याच काम युवासैनिक करत आहेत.त्यामुळे दिनेश जावळे सारख्या आक्रमक आणि कट्टर शिवसैनिकाला जिल्हाप्रमुख करुन,वरुण सरदेसाई यांनी आपला युवा शिलेदार विरोधकांना दोन हात करण्यासाठी मैदानावर सोडला आहे.जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या कडे आकर्षित होत असलेली तरुण पिढी पक्षाला बळ देणारी ठरत आहे.तर विरोधाकांना माञ याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.भविष्यात युवासेना कोणत्या मुद्दावर काम करेल.व विरोधकांना कस आव्हान देईल.याकडे जिल्ह्यातील सर्व जनतेचे लक्ष वेधून आहे.