मुंबई - देशात मोठ्या प्रमाणात On line व्यवहार सुरु झाले आहेत. तथापि दिवसे दिवस सायबर गुन्हे वाढत आहेत आणि डिजिटल प्रणालीबद्दल फारशी माहिती नसणारे लोक त्याला बळी पडतात. On line प्रणालीद्वारे व्यवहार करताना काय सावधगिरी बाळगायला पाहीजे, फसवे मेसेज, बनावट फोन/ ईमेल तसेच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या गफलती, ATM/Debit card द्वारे होणारी फसवणूक, वीज बिलाबाबत फसवे मेसेज याबाबत सोप्या शब्दात स्लाईड शो च्या माध्यमातून माहिती देणारा“सावध तो सुखी”हा दीड तासाचा विनामूल्य कार्यक्रम दहिसर पोलिस ठाणे तर्फे आयोजित करण्यात आला आहे. शनिवार 07 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 06:00 वाजता क्रिस्टल हॉल, पहिला मजला, राजश्री सिनेमा च्या मागे, मराठा कॉलनी,दहिसर पूर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध अर्थ चंद्रशेखर ठाकूर सादर करतील. तसेच दहिसर पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे विभागाचे अधिकारी अंकुश दाडंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे देखील अशा प्रकारचे गुन्हे घडल्यास काय करावे याबाबत मार्गदर्शन करतील. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या विनामूल्य कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आवाहन दहिसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण पाटील यांनी केले आहे.