पाटोदा तहसील कार्यालयाकडून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान पत्रकारांची विशेष नियम लादत केलेली मुस्कटदाबी चांगलीच अंगलट येताना दिसत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे सर्व पत्रकार आक्रमक होत जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेण्याच्या तयारीत आहेत. आज उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा येथे मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी पत्रकारांनी घडलेल्या संदर्भात निवेदन देत संबंधित अधिकारी व कर यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अनिता जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेऊन अशी निवेदनात मागणी केली आहे.
प्रशासनाची लोकाभिमुख कार्यासाठीच नेमणूक केलेली असते मात्र पाटोदा शहरात वेगळेच प्रकार दिसुन येत आहे.प्रशासनाच्या चुकावर बोट ठेऊन वास्तव वादी लिखाण करणाऱ्या पत्रकारांची जाणीवपूर्वक मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाल्याने पत्रकार आक्रमक झाले असुन त्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.पाटोदा तहसील कार्यालया संबंधित काही वस्तुनिष्ठ बातम्या आपल्या दैनिकांत प्रकाशित केल्याचा राग मनात धरून माननीय तहसीलदार व निवडणूक विभागाने वास्तव वादी लिखाण करणाऱ्या पत्रकारांना ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत वृत्तांकन करण्यापासून रोखण्यात आले असल्याने याविरोधात पत्रकारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिं २६ डिसेंबर रोजी निवेदन सादर करत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार दि.२ जानेवारी सोमवार रोजी उपविभागीय कार्यालया समोर लक्षवेधी आंदोलन करत निवडणूक प्रक्रियेत वृतांकना पासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी दयानंद सोनवणे, श्रीरंग लांडगे, अनिल गायकवाड, मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष सचिन पवार, शहराध्यक्ष हमीदखान पठाण, कार्याध्यक्ष सोमनाथ खंडागळे, सचिव अजय जोशी, डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष जावेद शेख, नानासाहेब डिडुळ, रियाज सय्यद, दिगंबर नाईकनवरे, हरिदास शेलार, दत्ता देशमाने, यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
तहसीलच्या अधिकाऱ्यांकडून जाणून-बुजून पत्रकारांवर लादले विशेष नियम
पाटोदा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व पत्रकारांना विशेष नियम लादत जाणून-बुजून त्रास दिल्याचं दिसून येत आहे. तसेच पत्रकारांनी काही तहसील कार्यालयात संदर्भात प्रसिद्ध केलेल्या बातम्या टोचलेल्या दिसत आहेत त्यामुळे पत्रकारांना विशेष नियम लादत दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु हे शक्य नाही, याच्यावर आवाज उठवला जाईल आम्हाला का दूर ठेवलं याची आम्हाला उत्तर द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊ याची संबंधितांनी नोंद घ्यावी.अशी मागणी प्रा.सचिन पवारअध्यक्ष मराठी पत्रकार परिषद पाटोदा यांनी केली .