आजचे विद्यार्थी हे एक परावलंबी बनत चालले असुन त्यांना त्यांचा डबा भरण्या पासुन तर स्कुलबस पर्यंत नेऊन सोडण्याची सर्व कामे आई - वडीलांना करावे लागतात . आतापासुनच दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय ही तुमच्या भावी आयुष्यामधे अतिशय घातक ठरू शकते .त्यामुळे तुम्हाला जर जिवनात प्रगती करायची असेल तर इतरांवर अवलंबुन न राहता स्वावलंबी बना . आणि ही सवय बालपणातच लावा . अशा प्रकारचे आवाहन प्रा . वसंतराव अवचार यांनी मालेगांव येथील विदर्भ पब्लीक स्कुल मधे विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना केले.

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

     विदर्भ पब्लिक स्कूल मालेगाव मधे स्पोर्टस विक चे आयोजन करण्यात आले होते . त्याचा बक्षीस वितरण समारंभ २८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश काळे हे होते . तर प्रमुख मार्गदशक व उद्‌घाटक प्राचार्य वसंतराव अवचार होते . तसेच संस्थेच्या सचिव सौ काळे मॅडम व प्राचार्य मालोकार यांची प्रमुख उपस्थिती होती . अतिशय देखण्या व शिस्तबद्ध सोहळ्यामधे धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या . त्यानंतर आठवडाभर झालेल्या विविध खेळांच्या विजेत्यांना पदके व प्रमाणपत्र देऊन प्रा . वसंतराव अवचार यांच्या हस्ते गौरविण्यात आले . यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की , विद्यार्थी जिवना मधे शिस्त व वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे . या वयात जर शिस्त व वेळेचे महत्व आपण जाणुन घेऊन त्याचे पालन करायला शिकले तर आयुष्या मधे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही . या वयात अभ्यासा बरोबरच खेळाला सुद्धा महत्व दिले पाहिजे . खेळामुळे मन मनगट आणी मस्तक सशक्त राहते व शरीर तंदुरुस्त राहुन दिर्घ आयुष्य लाभते . असे सांगुन ते पुढे म्हणाले की , मालेगांव सारख्या लहान गावात विदर्भ पब्लीक स्कूल सारखी चांगली व उच्च दर्जाची शाळा सुरू करून पालकांची व विद्यार्थ्यांची सोय जगदीश काळे यांनी करून दिली त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत . असेही ते म्हणाले .  कार्यक्रम व क्रिडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .