आ.संदिपभैय्या क्षीरसागरांची 50 लक्ष रु. विकास कामाची वचनपुर्ती
गोरक्षनाथ टेकडी येथील हॉटमिक्स रस्यां्षचे काम पूर्ण, तर सभागृहाचे काम सुरु - भाऊसाहेब डावकर
बीड - बीड तालुक्यातील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे आ संदिप क्षीरसागर यांच्या आमदार फंडातून सभागृहाचे काम काल हभप गुरुवर्य, शांतीब्रम्ह नवनाथ महाराज यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेले आहे. तर गोरक्षनाथ टेकडी फाटा ते टेकडीच्या पायरीपर्यंत व्हॉटमिक्स रोडचे काम पूर्ण करुन आमदार संदीप भैय्यांनी दिलेला शब्द पाळला असून त्यामुळे श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील वैभवात भर पडली असून टेकडीच्या भाविक-भक्तामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अशी माहिती भाऊसाहेब डावकर यांनी दिली.
श्री.क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील विकास कामे शांतीब्रम्ह ह.भ.प.नवनाथ महाराज यांच्या सुचनेनुसार होत आहेत. आमदार संदिपभैय्या क्षीरसागर यांनी केलेल्या उद्घाटनाची वचनपूर्ती केल्याने पंचक्रोतील जनता व भाविकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण महिन्यामध्ये गोरक्षनाथ टेकडीवर ह.भ.प.महंत किसनबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त गोरक्षनाथ टेकडीवर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. पण पावसाळ्यात मात्र किर्तनासाठी निवारा नव्हता. त्यासाठी तांत्रिक अर्थाने सभागृह असे नाव असले तरी भव्य असा डोम उभा करण्याचा मानस आमदार संदिपभैय्यांनी व्यक्त केला व प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील केली आणि अनेक वर्षापासून टेकडीचा रस्ता अत्यंत खराब असल्या कारणाने टेकडीवर जाण्यासाठी भक्तांना अडचण व त्रास होत असे. गाडया, रिक्षे जात नसायचे याचा सर्वेसर्वा विचार करुन आमदार साहेबांनी गोरक्षनाथ टेकडीच्या पायरीपर्यंत तात्काळ व्हॉटमिक्स रस्ता तयार करुन दिला. त्याबद्दल नागरीकांनी व भाविकभक्तांनी आमदार संदिपभैय्यांचे आभार व्यक्त केले. ह.भ.प.शांतीब्रम्ह नवनाथ महाराज यांच्या हस्ते प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. याप्रसंगी आ.संदिपभैय्यां क्षीरसागर यांचे कार्यकर्ते व गोरक्षनाथ टेकडीचे भक्त भाऊसाहेब डावकर, प्रकाश ठाकूर, दादासाहेब लांडे, शहादेव लेंगरे, अर्जून काळे, बळवंत डावकर, अनिल लांडे, गुंडाकांत घुमरे, राजेभाऊ घोरड आदी कार्यकर्ते उपस्थित होते