जिल्हयात कलम 37(1) (3) लागू जिलाधिकारी यांचे आदेश
गडचिरोली,(महाराष्ट्र )दि.05: पोलीस अधिक्षक ,गडचिरोली, यांचे साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबधात्मक उपाययोजना सुरु आहेत.तसेच दिनांक 09 ऑगस्ट 2022 रोजी मोहरम उत्सव , दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्रदिन उत्सव, दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी श्रीकृष्ण जयंती व गोपाळकाळा उत्सव जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही राजकीय पक्ष, संघटना व इतर नागरिक हे धरणे,मोर्चे ,आंदोलने, सभा, मिरवणूक , सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडु नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्य दृष्टीने संपुर्ण गडचिरोली जिल्हयात दिनांक 09 ऑगस्ट 2022 चे 00.01 वा ते दिनांक 23 ऑगस्ट 2022 चे 24.00 वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम ,1951 चे कलम 37(1) (3) लागू होणेस आहे.असे अतिरिक्त् जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांनी कळविले आहे.