पिंपळे जगताप ता. शिरुर येथील एका इसमाला किरकोळ कारणातून त्याच्या पुतण्याने विळ्याने मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नंदकुमार वामनराव शितोळे व ऋत्विक नंदकुमार शितोळे या बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पिंपळे जगताप ता. शिरुर येथील शामराव शितोळे हे केनॉलच्या रस्त्याने चाललेले असताना त्यांचा भाऊ नंदकुमार तेथे आला त्याने शामराव यांना अडवून तू माझ्या मुलाला शिव्या का दिल्या असे विचारले तेव्हा मी शिव्या दिल्या नाही असे शामराव म्हणाला त्यावेळी ऋत्विक हा हातामध्ये विळा घेऊन तेथे आला, तो शामराव यांना मारत असताना त्यांनी एका हाताने विळा धरला मात्र ऋत्विक याने त्यांना हाताने मारहाण केली तसेच विळा देखील शामराव यांच्या हाताला व दंडाला लागल्याने शामराव शितोळे हे जखमी झाले, याबाबत शामराव वामनराव शितोळे वय ५३ रा. नवोदय विद्यालय जवळ पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नंदकुमार वामनराव शितोळे, ऋत्विक नंदकुमार शितोळे दोघे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे.