पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाच्या उमेदवारांचा दणदणीत विजय 

पैठण(विजय चिडे) औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असणाऱ्या ७ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले असून ७ पैकी ६ जागांवर शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत..तर उर्वरित खांदगाव येथील एका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे...६ ग्रामपंचायतींवर आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झालाय...अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर आणि गावतांडा या ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत...सत्ता स्थापनेनंतर शिंदे गटाला मिळालेलं हे मोठं यश मानलं जातंय...