वंचित बहुजन युवा आघाडीच्या अध्यक्षपदी मेजर अनुरथ वीर तर महासचिव राजेंद्र कोरडे यांची नियुक्ती.
बीड (प्रतिनिधी) वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा कार्यकारणीच्या मुलाखती संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशान्वये व वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा यांच्या सूचनेनुसार बीड जिल्हा प्रभारी अमोल लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्या होत्या.
भारतीय सैन्यामध्ये कर्तव्य बजावून आल्यानंतर सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेषित असणारे पाली येथील मेजर अनुरथ वीर यांच्या खांद्यावर बीड जिल्हाध्यक्ष पदाची धुरा राज्याध्यक्ष निलेश जी विश्वकर्मा यांनी सोपवली. तर जिल्हा महासचिव म्हणून विठ्ठल मोहिते,राजेंद्र कोरडे यांची निवड करण्यात आली.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष बाळासाहेब साबळे,उमेश तूळवे, अशोक शिंदे,अमोल साखरे यांचे सह जिल्हा संघटक प्रतीक (अजय) सरवदे,सचिव प्रदीप उबाळे,प्रकाश ढोकणे,सहसचिव श्रीकांत भोले,राजीउद्दीन शेख, उमेश चव्हाण राजेंद्र अडसूळ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शत्रुघन कसबे यांची नियुक्ती करण्यात आली.
या सर्वसमावेशक जिल्हा कार्यकारणीच्या निवडीबद्दल विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पाटील जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे व वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी, बबन वडमारे, संतोष जोगदंड, पुरुषोत्तम, युनूस शेख,दगडु गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष एड.अनिता चक्रे, पुष्पाताई तुकमारे, नंदा भंडार, बालाजी जगतकर, डॉ. गणेश खेमाडे, पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.