कोर्लई ग्रामस्थांनी जो विश्वास निवडणुकीत दाखविला तो विकासकामांच्या माध्यमातून सार्थ करणार :प्रशांत मिसाळ

झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोर्लई ग्रामस्थांनी मोठया विश्वासाने विरोधकांना चपराक देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वसामान्य शिलेदार यांना निवडून जो विश्वास दाखविला तो विकास कामांच्या माध्यमातून सार्थ करणार असल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रशांत मिसाळ केले आहे.

  रायगड जिल्ह्यातील कोर्लई ग्रामपंचायतीवर ही 1997 पासून सलग शिवसेनेचा भगवा हा सातत्याने फडकत असून तो फडकतच राहणार आहे.कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत जो काही विकास झाला आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून झाला आहे.कोर्लई ग्रामस्थांनी आज पर्यंत शिवसेना तसेच सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे सार्थ ठरला असून शेवटपर्यंत असाच राहणार आहे.कोर्लई ग्रामपंचायतीवर 1997 साली प्रथम भगवा फडकला तो यापुढेही फडकत राहणार आहे .कोर्लई ग्रामस्थांना कोणीही चिथावणी देण्याचा प्रयत्न केला तरी कोर्लई येथील नागरिक हे सुज्ञ असल्याने विरोधकांच्या भूलथापांना बळी पडत नाही.

 सद्यस्थितीत जे विरोधक आहेत तर खंडणीखोर असून त्यांना आमदार यांनी पाठीशी घातले आहे मात्र ते पात्रतेचे नाही आहेत.विकासाच्या दृष्टीने जे उमेदवार समोर आहेत ते विरोधक शून्य आहेत.असेही मिसाळ यांनी सांगितले.