पुणे जिल्हासह शिरूर तालुकाचे लक्ष लागून राहिलेल्या टाकळी हाजी ग्रामपंचायतमध्ये माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या गटाला जोरदार धक्का बसला असून टाकळी हाजी ग्रामपंचायतवर दामूशेठ घोडे यांच्या पॅनलने 16-1 अशी एकहाती सत्ता मिळवली आहे दामुआण्णा घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापण केली आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान दोन्ही बाजूने एकमेकांवर खालच्या स्तरावर जावून टिकाटिप्पणी होत होती. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला होता, ही निवडणूक दोन्ही बाजूने प्रतिष्ठेची करण्यात आली होती
टाकळी हाजी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार पोपटराव गावडे व माजी सरपंच दामू शेठ घोडे यांच्या दोन पॅनलमध्ये ही निवडणूक झाल्याने तालुक्यासह जिल्ह्याचे या ग्रामपंचातीकडे सर्वांचे लक्ष लागले होते,त्याचे कारण ही तसेच आहे.माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या घरातून व दामूआण्णा घोडे हे राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार आहे. या विजयावरच पक्ष उमेदवारी ठरवणार असल्याची खात्रीलायक माहीती सुत्रांनी दिली आहे.
मळगंगा ग्रामविकास या पॅनेलने मळगंगा परीवर्तन पॅनेलचा धुव्वा उडवला असून दामुआण्णा घोडे यांच्यासह त्यांची पत्नी अरुणाताई घोडे यांनीही दणदणीत विजय मिळवल्याने दामुआण्णा घोडे हे राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार म्हणूण प्रमुख दावेदार मानले जात आहे.