बिलावल भुट्टोंच्या विरोधात अलिबाग भाजप आक्रमक

 पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावर भुट्टो यांच्या विरोधात भाजपने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात आंदोलन करण्यात आले.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो यांच्याविरोधात भाजपने आज शनिवारी अलिबाग शहरातील महावीर चौक येथे आंदोलन केले. भाजपकडून बिलावल भुट्टो यांचा फोटो फाडुन त्याचे दहण करण्यात आले 

  पाकिस्तानचे विदेशमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदल अपशब्द वापरल्याने देश भरात भाजपाच्या वतीने भुट्टो यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत, पाकिस्तानचा ध्वज आणि भुट्टो यांच्या फोटो अग्नी देण्यात आली. नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व उदयास येत असल्याने पाकिस्तान आणि त्यासारख्या इतर देशांना त्रास होतोय. पाकिस्तान हा भिकारडा देश झाला असून, त्याने भारतासारख्या समृद्ध देशाच्या पंतप्रधानांवर बोलणं शोभत नाही. बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याची किंमत पाकिस्तानला नक्कीच मोजावी लागेल असा इशारा आंदोलकांनी दिला.

यावेळी सुनील दामले, निखिल चव्हाण, रूपेश पाटील,समीर राणे,आशिष तरे,देवेन सोनवणे,प्रकाश पाटील,शंकर भगत आदी कार्यकर्ते पदाधिकरी उपस्थित होते.

ज्या देशाचे स्वतःचे अस्तित्व नाही त्या देशाने भारतासारख्या सक्षम देशाच्या पंतप्रधानच विरोधात बोलणे हे चुकीचे आहे. संपूर्ण जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला घेतात आणि अशा प्रंतप्रधानांच्या विरोधात टीपणी केलेली खपून घेतली जाणार नसल्याचे भाजप अलिबाग शहर अध्यक्ष अंकित बंगेरा यांनी सांगण्यात आले.