सोन्याची बिस्किटे चोरणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई 

पावणेतीन किलो सोन्याचा मुद्देमाल जप्त 

प्रतीक चौधरी हैद्राबाद होलसेल व्यापारी हे मुंबई हैद्राबाद असा प्रवास करीत असताना अज्ञात चोरांनी सुमारे दीड कोटींचे 2. 732 किलोग्रॅम वजनाचे सोन्याची बिस्किटे आणि दागिने चोरून नेले होते. यामुळे प्रतीक चौधरी यांनी खोपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने मध्यप्रदेश राज्यातील खैरवा येथील धार येथे जाऊन चोराच्या मुसक्या आवळल्या. या चोराकडून पोलिसांनी पावणेतीन किलो सोन्याच्या वस्तू हस्तगत केला आहे . या गुन्ह्यातील एक चोर अद्याप फरार आहे. 

खोपोली पोलीस ठाणे परिसरातील फुडमॉलच्या पार्किंगमधील प्रवासी वाहनातून अज्ञात आरोपी यांनी एकुण १,४४,००,००० रुपयांचे एकुण २.७३२ किलो ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट तसेच दागिने चोरी करून नेले होते. सदर गुन्हयाची तिव्रता पाहता सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश सोमनाथ घार्गे यांनी दिले होत्व. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. एक पथकामार्फत अशा प्रकारचे गुन्हे करणारे बाहेर रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच बाहेरील राज्यांतील आरोपीत यांचा शोध घेणे तसेच दुसरे पथकामार्फत घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणे करणे सुरू होते.

तपास पथकास घटनास्थळवरील सी.सी.टी.व्ही. कॅमे-यामध्ये संशयीत चोरांचे फोटो प्राप्त झाले. सदर संशयित आरोपींच्या फोटोंच्या साहाय्याने माहीती घेत असतांना पोलीस निरीक्षक दयानंद गावडेयांना माहिती प्राप्त झाली की, अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी हे मध्य प्रदेश राज्यातील खैरवा, ता. मनावर, जि. धार येथील आहेत. सदर बातमीची खातरजमा करण्याकरिता तत्काळ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोहवा राजेश पाटील, यशवंत झेमसे व प्रतिक सावंत असे पथक मध्यप्रदेश राज्यामध्ये रवाना झाले. त्या ठिकाणी जावून सीसीटीव्ही मधील प्राप्त फोटोच्या आधारे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी हा पप्पू बाबू खान मुलतानी, रा. खैरवा, ता. मनावर, जि.धार, राज्य मध्यप्रदेश हा असल्याची खात्री झाली. त्यामुळे पप्पू बाबू खान याचे घरी छापा टाकला असता तो घरीमिळाला नाही. त्याच्या घराची घरझडती घेतली असता झडतीमध्ये काहीच सापडले नाही. त्यानंतर पप्पू बाबू खान मुलतानी याचा सख्खा भाऊ ईस्माईल बाबू खान, वय २७ वर्षे, रा. खैरवा, ता. मनावर, जि. धार, राज्य मध्यप्रदेश याच्याकडे पप्पू बाबू खान व गुन्हयातील मालाबाबत सखोल विचारपूस केली असता सदरचा गुन्हा हा त्याचा भाऊ पप्पू बाबू खान याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याचे सांगून पप्पू बाबू खान याने त्याच्याकडे ठेवण्यास दिलेली एकूण २.६८४ कि.ग्रॅम वजनाची १,४२,२५,९४२ रूपये किंमतीची सोन्याची बिस्कीटे व दागिने असा मुद्देमाल समक्ष हजर केला. सदरचा मुद्देमाल दोन पंचांसमक्ष पंचनाम्याव्दारे जप्त करण्यात आला आहे.या तासामध्ये या चोरीतील मुख्य सूत्रधार पप्पू बाबू खान मुलतानी व त्याचे साथीदार अद्याप फरार आहेत. 

सदर गुन्हयामधील चोरीस गेलेले २.६८४ किलो ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट तसेच दागीने असा एकुण १, ४२, २५, ९४२ रुपये किंमतीचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

सदरची कामगिरी स्था.गु.अ. शाखा रायगडचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि नागेश कदम, सहा फौजदार दिपक मोरे, देवराम कोरम, पोहवा राजेश पाटील, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, पो. शि. ईश्वर लांबोटे यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे .