तांडा बु.ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन 

       

पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील तांडा बु.ग्रुप ग्रामपंचायत मध्ये रोहयो तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी सरपंच एकनाथ वाघ,नारायण नरवडे,नरहरी नंदीले यांनी मंत्री संदिपान भुमरे यांचा सत्कार केला.दरम्यान तांडा बु.ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत रोहयो तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या विशेष प्रयत्नातून मारोती मंदिर पेव्हर ब्लॉक, ग्रामपंचायत इमारत, जलजिवन पाणी पुरवठा योजनेसह विकास कामांचे रोहयो व पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.यावेळी बोलतांना मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले की, जलजिवन पाणी पुरवठा योजनेतंर्गत तालुक्यातील 181 गावात पिण्याचे पाणी मिळणार असून शेतीसाठी व वाड्यावस्तीवरील ट्रान्सफॉर्मर साठी जिल्हा नियोजन समितीतून 45 कोटी रूपये मंजूर केले आहे.तालुक्यातील संपूर्ण गावात स्मशानभूमी शेड उभारणार आहे.पैठण मध्ये पाचशे एकर मध्ये मदर प्लांट उभारणार असून त्यापासुन शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची फळबाग रोप देणार आहे.यासह मातोश्री पाणंद रस्ता,वैयक्तिक सिंचन विहिर, जनावरांचे गोठा,महोगुणी यासह फळबाग लागवड या योजनांचा लाभ रोहयो खात्यांतर्गत देण्यासाठी मी इमाने-इतबारे काम करीत असून संततधार पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित ठेवणार नाही व येणाय्रा काळात विकास कामांच्या माध्यमातून विरोधकांना बोलायला जागा शिल्लक ठेवणार नाही असे रोहयो व पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले.यावेळी सरपंच एकनाथ वाघ, ग्रामपंचायत सदस्य नारायण नरवडे,कल्याण चाबुकस्वार,आप्पा नरवडे,नरहरी नंदिले,अरूण बोडले,कृष्णा भुमरे,विलास गोरे,नामदेव तांबे,बाबुराव पडुळ, शाम तांगडे,राजेंद्र तांबे,मारोती इंगळे,पंचायत समिती सदस्य सोपान ढोरकुले,अर्जुन नरवडे,गणेश नलावडे,संतोष नलावडे,अमोल गोर्डे,रविंद्र भुजबळ,सोपान भालेकर, मच्छिंद्र गल्हाटे,प्रभाकर तांबे,रामेश्वर तांबे,पिंटु तांबे,तात्यासाहेब नलावडे,बाप्पु महाराज कोहकडे,राजेंद्र महाराज नलावडे,गणेश नरवडे,सतिश नरवडे,मच्छिंद्र घोरपडे,भास्कर चाबुकस्वार, नरहरी कुंटेवाड, योगेश भंडारे,अशोक भंडारे यांच्यासह गावकय्रांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.यावेळी पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलीस नाईक संतोष चव्हाण,संदीप पाटेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.