दिलेला शब्द पाळणारा आणि आपली तत्वे जपणारा माणूस म्हणजे पिंट्या गायकवाड
सर्व सामान्य जनतेला दिलेला शब्द पाळणारा आणि आपली तत्वे जपणारा माणूस म्हणजे प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड.. त्याचप्रमाणे गरिबीची जाण असणारा, राजकीय मतभेद विसरून सर्वांना मदत करणारा सर्वसामान्य जनतेचा कैवारी बनले आहेत.
अलिबाग तालुक्यातील चोंढी सारख्या छोट्याशा गावातील प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड ह्याचा जन्म शेतकरी परिवारात 16 डिसेंबर रोजी झाला आहे.त्यांच्या परिवारात त्यांचासाहित एक भाऊ आणि एक बहीण आणि आई वडील आहेत.
कोणत्याही क्षेत्रात ज्येष्ठांच्या अनूभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही आणि त्यांच्या अनुभवाची शिदोरी समाजाला दिशा देणारी आहे.पिंट्या गायकवाड ह्यांनी त्यांच्या घरच्या गरिबी परिस्थिती मुळे गरिबीची झळ काय असते हे त्यांना लहानपणीच समजले.त्यांचे सुरवातीचे शालेय शिक्षण हे चोंढी येथे पार पडले तर उर्वरित शिक्षण अलिबाग येथे केले आहे.त्यांनी शालेय जीवनात निश्चय केला होता की,जसे माझ्या वाटेला गरिबी आली आली आणि पुरेसे शिक्षण घेऊ शकत नाही असे दुःख इतरांच्या वाटेला येऊ नये आणि कोणी मदत मागितली तर त्याला निराश होऊ देऊ नये.
त्या निश्चयानुसार पिंट्या गायकवाड यांनी त्यांना समज आल्यापासून जेवढी शक्य मदत करण्यास सुरुवात केली. आज तत्यांनी त्यांच्यासंपर्कात असणारे मुंबईतील धनाढ्य व्यक्ती यांच्या सहकार्याने चोंढी सहित आजूबाजूला असणाऱ्या गोरगरीब गरीब जनतेसाठी सुसज्ज अशी कार्डियाक रुग्णवाहिका ही मिळवली असून त्या रुगवाहिकेचा वापर गोरगरीब जनतेसाठी विनामूल्य केले जात आहे.आजपर्यंत पिंट्या गायकवाड यांनी सामाजिक दायित्व ओळखून अनेक सामाजिक कार्य हाती घेऊन त्याचा फायदा गोरगरीब जनतेला कशाप्रकारे होईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे.
विकासासाठी योगदानाला व संघर्षाला तिथुच सुरुवात झाली. शालेय जीवनापसूनच गोरगरिबांची बाजू कायम उचलून धरून त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत झटत राहणे हेच आयुष्यातील ध्येय. आणि 24 तास सामान्य व गरीब जनता केंद्रस्थानी ठेवून झटणाऱ्या चोंढी या गावातील पिंट्या गायकवाड याच्यावर मराठा समाजाने अलिबाग तालुका मराठा समाज उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.त्याचबरोबर गावाच्या विकसासाठी सढळ हाताने निधी मिळत असल्याने गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गायकवाड हे दिवस-रात्र एक करीत आहेत. गोरगरिबांच्या आणि गावाच्या हितासाठी कायम झटणाऱ्या पिंट्या गायकवाड यांची "गोरगरीब जनतेचा कैवारी' म्हणून अलिबाग तालुक्यात ओळख आहे.
पिंट्या गायकवाड यांचे राजकीय व सामाजिक क्षेत्रात खुप मोठे योगदान आहे,प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यात त्यांचा नेहमीच प्रथम सहभाग असतो,त्यांनी आजारी व गरीब रुग्णांना मोफत अँम्ब्युलन्स सेवा उपलब्ध केली आहे.ग्रामपंचायत सदस्य कारकिर्दीत अनेक लोकोपयोगी विकासकामे केली व करत आहेत.नुकतेच किहीम येथे माजी पालकमंत्री व आमदार अदितीताई तटकरे यांच्या कडून जगप्रसिद्ध पक्षी तज्ञ डॉ.सलिम अली यांचे अभ्यासकेंद्र मंजूर करून त्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.गायकवाड यांना त्यांच्या कुटुंबातील आई,वडील,बहीण,भाऊ,पत्नी यांची मोठी साथ तर असतेच शिवाय ते एक अजातशत्रू असल्याने त्यांचा सर्वधर्मीय मित्रपरिवार खूपच मोठा आहे.
आपले राजकीय गुरु माजी आमदार स्वर्गीय मधूशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने व स्वकर्तुत्वाने जनमाणसात चांगलेच मिसळून ते आपले कर्तव्य पार पाडत असतात.त्यांना रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांची प्रत्येक वेळी मोलाची साथ मिळते.त्यांचे रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे,माजी रायगड जिल्हा पालकमंत्री व आमदार अदितीताई तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,शेकाप,मनसे आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले सलोख्याचे संबंध आहेत.