किन्हीराजा येथील ३३केव्ही विज उपकेंद्रा तील यार्डमध्ये यंञचालक शरद रामटेक वीजपूरवठा सुरळीत करण्यासाठी गेले असता त्यांना जबरदस्त विजेचा शाॅक लागून गंभीर जख्मी झाल्याची घटणा दि. १४ बूधवार च्या सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान घडली सुदैवाने कनिष्ठ यंञचालक यांचे प्राण दैव बलवत्त असल्यामुळे वाचल्याची घटणा घडली 

किन्हीराजा येथील ३३ केव्ही विज उपकेंद्रात मागील काही वर्षापासून कनिष्ठ यंञचालक शरद रामटेक हे कार्य करीत असून कर्तव्यदक्ष कर्मच्यारी म्हनुन त्यांची ख्याती आहे आज सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान यार्डमध्ये जावुन आपळे कर्त्तव्य बजावत असतांना व विज पुरवठा सुरळीत करण्या साठी गेले असता यंञचालक अचानक रामटेक यांना विजेचा जबरदस्त शाॅक लागला व त्याच ठीकाणी पडले हाताची बोटे ही वीजेच्या शाॅकने भाजली असून यार्डमध्ये गेलेले यंञचालक रामटेके ला पाहणी करण्यासाठी इतपही कर्मच्यारी त्या ठीकाणी गेले असता यंञचालक शरद रामटेके हे यार्डजवळ पडलेल्या स्थिति दीसून आले याबाबत माहीती मीळताच सर्वच कर्मच्यार्यांना यार्डकडे धावघेतली व वीजेच्या शाॅकने गंभीर जख्मी झालेले शरद रामटेके यांना प्रथम स्थानिक आरोग्य वर्धिनी येथे नेण्यात आले पूढील उपचारासाठी वाशीम येथील जील्हा सामान्य रुग्नालयात व नंतर अमरावती येथे नेण्यात आले आहे यापूर्वीही दि. २२नोव्हेबरला याच फिटर वरील डीपीवर काम करतांना बाह्यत्रोत कर्मचारी गोपाल हरणे यांना ही बंद फिल्डरवर काम करीत असताना अचानक विजेचा शाॅक लागला व त्यात ते गंभीर जख्मी झाले होते बाह्यत्रोत कर्मचारी गोपाल हरणे यांचेवर अजूनही वाशीम येथील खाजगी रुग्नालयात उपचार शुरू आहे . ३३ केव्ही विज उपकेंद्रातून वीजपूरवा बंद असतांना ही गोपाल हरणे यांना विजेचा शाॅक लागला होता व आजही काही तसाच प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे . या घटनेला २० दिवसाचा कालावधी होऊन ही आता पर्यंत कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून सदरील अपघाताची साधी चौकशी ही करण्यात आली नाही व घटना स्थळी अपघात कशामुळे झाला या मध्ये दोषी कोण आहे याला पा ठिशी का का घालण्याचे येत आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे प्रथम घटना घटली त्याच्या शोध चौकशी वरिष्ठ स्थळावरून करण्यात आली असती तर आज हा दुसरी घटना घटली नसती हे एक सत्य आहे २० दीवसाच्या फरकाने दोन वेळा हा प्रकार झाल्याने हा विषय गंभीर वळनावर असून या गंभीरप्रकाराला जबाबदारी कोण याचा शोध घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.