अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथील आयडीबीआय बँकेला आग लागल्याची माहिती आरसीएफ थळच्या अग्निशमन दलामुळे धोकवडे येथील आयडीबीआयचे संभाव्य मोठे नुकसान टाळण्यात यश आले आहे.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

  धोकवडे येथीलआयडीबीआय बँकेचे सकाळी कामकाज सुर असताना अकराच्या सुमारास अचानक आग लागली असल्याची माहिती मांडवा पोलीस ठाण्यास मिळाली असता पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे कर्मचारी सुधीर पाटील आणि बँकेचे व्यवस्थापक अमित कांबळे यांच्याकडून थळ येथील आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलास प्राप्त झाली .आग लागल्याची माहिती मिळताच आरसीएफ अग्निशमन केंद्राचे कर्तव्यावर असलेले सुरक्षा अधिकारी प्रशांत घरत किशोर म्हात्रे, चालक संजय म्हात्रे यांसह वरिष्ठ अग्निशमन प्रचालक रितेश वासनकर, शुभम सातपुते, निकितेश यांनी गांभीर्याने दखल घेत कर्मचारी फोर इन वन टेंडर घेऊन घटनास्थळी हजर झाले. 

त्यावेळी आयडीबीआय बँकेतून मोठ्या प्रमाणात काळा धूर येत असल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन दल जवानांनी तत्परतेने उच्च दाबाच्या होज रीलच्या साह्याने तीन ब्रीदिंग ऑपरेटर्स सेट्स लावून आग विझवण्याचे काम चालू केले त्यासोबतच चार डीसीपी एक्सटींग्विशरच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. मुख्यतः सर्व्हर रूममध्ये लागलेली आग फोमचा वापर करून विझवली गेली व नंतर कूलिंग ऑपरेशन करण्यात आले. आरसीएफ थळच्या अग्निशमन दल जवानांच्या तत्पर प्रयन्तंमुळे आग त्वरित आटोक्यात आणण्यात यश आल्याने संभाव्य मोठी हानी टाळता आली.

 आयडीबीआय बँकेला लागलेली आग विझविण्यासाठी आरसीएफ च्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी यानी केलेल्या अथक प्रयत्नाचे बँकेचे व्यवस्थापक आणि उपस्थित नागरिकांनी आभार मानले