बाळासाहेबांची शिवसेनेकडे आली बिनविरोध तेलवडे ग्रामपंचायत
मुरूड तालुक्यातील बहुचर्चित असलेली तेलवडे ग्रामपंचायत ही बाळासाहेबांची शिवसेनेने बिनविरोध घेतली आहे.आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून तेलवडे ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी ग्रामपंचायत बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या ताब्यात बिनविरोध दिली आहे.
तेलवडे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच कल्पना अंकुश पवार,सदस्य निलेश हरिश्चंद्र तांबडकर,परशुराम नथुराम वाघमारे,रुपाली रमेश वाघमारे,अनिता कृष्णा वारगे,कमल विठ्ठल वारगे,वसुंधरा काशिनाथ करमरकर,हर्षाला हरिदास शिद्रे हे बिनविरोध निवडून आले आहे.
नवनिर्वाचित सरपंच तसेच सदस्य यांचे आमदार महेंद्र दळवी,बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटिका शुभांगी करडे,उपतालुका प्रमुख भरत बेलोसे, तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यांनी अभिनंदन करीत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अलिबाग मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यशैलीतुन तेलवडे ग्रामपंचायतीचा विकास मोठ्या प्रमाणात होणार असून मुरूड तालुक्यासहित जिल्ह्यात तेलवडे ग्रामपंचायत नंबर एक कशाप्रकारे राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच कल्पना पवार यांनी सांगितले आहे.
तेलवडे ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन ग्रामपंचायत ही बिनविरोध निवडून दिली आहे.ग्रामस्थांनी जो विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टाकला आहे तो सार्थ ठरणार आहे. :-आमदार. महेंद्र दळवी.अलिबाग मुरूड विधानसभा मतदारसंघ