कोरोना महामारीमध्ये देशात डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. भारताने या वर्षी अर्ध-शहरी आणि ग्रामीण भागातील दुकानांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहारांमध्ये तब्बल 650 टक्के वाढ नोंदवली आहे.

मंगळवारी एका अहवालात ही बाब समोर आली आहे. शाखारहित बँकिंग आणि डिजिटल नेटवर्क पेनियरबाय (PayNearby) च्या अहवालानुसार, 2022 मध्ये देशातील निम-शहरी आणि ग्रामीण रिटेल काउंटरवरील सहाय्यक आर्थिक व्यवहार मूल्य आणि खंडात अनुक्रमे 25 टक्के आणि 14 टक्क्यांनी वाढ नोंदवली. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति व्यवहार सरासरी रोख पैसे काढण्याचे प्रमाण थोडे कमी झाले असले तरी, मायक्रो-एटीएम आणि एमपीओएस उपकरणांच्या मागणीत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 मध्ये, प्रति व्यवहार सरासरी रोख पैसे काढण्याचे प्रमाण 2,620 रुपये होते, या वर्षी ते 2,595 रुपये आहे. वित्तीय संस्था आणि एनबीएफसीच्या ईएमआय संकलनात 200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

पेनियरबायचे संस्थापक, एमडी आणि सीईओ आनंद कुमार बजाज म्हणाले, 'भारत महत्वाकांक्षी देश आहे. या ठिकाणी ग्रीन शूट सेवांचा वाढता वापर हा असिस्टेड कॉमर्स, ओटीटी सबस्क्रिप्शन, मायक्रो लेंडिंग या सेवा जवळपासच्या स्टोअरमध्ये सहज उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतात.' अहवालात म्हटले आहे की, डिजिटल व्यवहारातील ही वाढ अर्ध-शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांमधील ग्राहकांमध्ये झालेले बदल दर्शविते. आता अधिकाधिक नागरिक त्यांच्या बँकिंग आणि जीवनशैलीच्या गरजांसाठी सहाय्यक डिजिटल माध्यमांचा अवलंब करत आहे आणि त्याद्वारे ते औपचारिक अर्थव्यवस्थेत सामील होत आहेत. ( आता एटीएममधून प्राप्त करू शकता सोने; Hyderabad मध्ये सुरु झाली सेवा, जाणून घ्या काय आहे खास) 

शेवटी बजाज म्हणाले, 'आम्ही या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत सुमारे 70,000 कोटी रुपयांच्या डिजिटल सेवा दिल्या आहेत. काही ग्रीन शूट सेवांचा जलदगतीने वापर करण्यासह रोख पैसे काढण्याच्या व्यवसायाची स्थिर वाढ ही, साथीच्या रोगाच्या विनाशकारी प्रभावानंतर आपल्या अर्थव्यवस्थेत स्थिर पुनर्प्राप्ती दर्शवते.