ढाकेफळ येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्वराज्य संघटनेच्या वतीने प्रज्ञासूर्याला अभिवादन कार्यक्रम

ढोरकीन / प्रतिनिधी 

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने स्वराज्य संघटनेच्या वतीने दि. ६ डिसेंबर मंगळवार रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ढाकेफळ (ता.पैठण) येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

याप्रसंगी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

यांच्या प्रतिमेचे पुजन करत पुष्पहार अर्पण करून प्रज्ञासूर्याला अभिवादन केले.

उपस्थित मान्यवरांनी डॉ‌.बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविंद्र शिसोदे,सरपंच भिमा मोरे,मनोज शिसोदे,

छावाचे जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत,

विकास शिसोदे,ग्रा.पं.सदस्य मनेष आव्हाड,स्वराज्य संघटनेचे किरण काळे पाटील,

नारायण सोणवने,बप्पासाहेब शेळके,भारत शिंदे,संजय मरकड,विलास शिंदे,कामगार नेते सुभाष आढाव,सतिश श्रीसुंदर,कृष्णा उघडे,अमरापूर वाघुंडीचे पोलीस पाटील कडूबाळ चाबुकस्वार,संकेत शिंदे,अमोन आव्हाड,आर्शद पठाण,

सुनिल आव्हाड,अशोक शिंदे,बंडु शिरवत, कचरू कोरडे,जनार्दन आदमाने,रावसाहेब शिरवत, बाबासाहेब आदमाने,मदन थोटे,आसाराम आदमाने, देविदास पाचे,

रावसाहेब शहाराव,दिलीप आव्हाड,रवी शिंदे,भगवान सोलाट यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य संघटनेचे किरण काळे पाटील यांनी केले होते.