अंतरवाली खांडी मध्ये गावात हर घर तिरंगा रॅलीचे गावामध्ये जनजागृती
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
पाचोड;
पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत अंतरवाली खांडी येथे (दि ४)ऑगस्ट रोजी प्रजासत्ताक भारत देशाला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे भारताचा अमृत महोत्सव देशभर साजरा होत आहे .या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार घर घर तिरंगा हर घर तिरंगा ही देशव्यापी मोहीम खांडी आंतरवाडी ग्रामपंचायत व अशोक विद्यालयाच्या वतीने गावात रॅली काढण्यात आली .त्याचा कालावधी दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे.
त्याची पूर्व सूचना सरपंच शशिकला रामनाथ डिघुळे,उपसरपंच नवनाथ कळमकर यांनी शाळेतील प्राध्यापक यांची भेट घेऊन शाळेमध्ये व गावच्या वतीने गावात या रॅलीचे आयोजन केले होते .या रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील नागरिक सहभागी झाले होते. गावात स्वतंत्र्य दिनाच्या अगोदर तीन दिवस विद्यार्थी व गावातील नागरिक हे फेऱ्या काढून जनजागृती करणे व लोकांमध्ये देशभक्ती जागृत करणे यासाठी गावात 4 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत अंतरवाडी खांडी व अशोक विद्यालयाच्या वतीने संयुक्त विद्यार्थ्यांची फेरी काढून देशभक्तीवर फलक दर्शवत घोषणा देण्यात आल्या.
व गावातील मारुती मंदिरासमोर सामूहिक राष्ट्रगीत घेऊन सर्व शिक्षक,शिक्षकेतर, गावातील नागरिक 15 ऑगस्ट च्या कार्यक्रमाची माहिती दिली .यावेळी उपस्थित अंतरवाली खांडी गावच्या सरपंच शशिकला रामनाथ डिघुळे,उपसरपंच नवनाथ कळमकर ,ग्रामसेवक पोकले साहेब ग्रा पं सदस्य गिता विघ्ने, अनिता ताठे ,मंगल डिघुळे, राधा घुगे, दादा पाटील घुगे ,मिठू म्हस्के, तेजेश्वर वाहुळे पोलीस पाटील सुनीता डिघुळे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव पा. हांडे जि. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक वाडेकर सर, शिक्षक खिल्लारे सर, जाधव सर, कराड मॅडम, बुरुकुल मॅडम, पोहरे मॅडम, अशोक विद्यालय चे मुख्याध्यापक कदम सर ,शिक्षक विर ,वडकर ,राठोड, गुंजाळ ,फुंदे. वाघ, गीते ,माळी ,शरद, अंगणवाडी सेविका भागीरथी डिघुळे, प्रयागाबाई डिघुळे ,सोनाली डिघुळे, ग्रा.पं.चे कर्मचारी रामनाथ डिघुळे संभाजी डोईफोडे, बप्पासाहेब डिघुळे, रवींद्र वीर, जयराम वाल्हुरे ,शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.