जागतिक एड्स दिनानिमीत्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण अंतर्गत ग्रामीण रुग्णालय रिसोडच्या वतीने आज ५ डिसेंबर रोजी रिसोड शहरातून एड्स विषयक जनजागृतीकरीता ऑटो रॅलीचे आयोजन करण्यात आले रॅलीला वैद्यकीय अधिकारी मा.श्री.डॉ वाशिमकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली . यावेळी मा.श्री.गायकवाड साहेब API रिसोड पोलीस स्टेशन जय लखमा पॅरामेडिकल डी.एम.एल.टी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन भाऊ गांजरे, संत गजानन महाराज विद्यालय कांकरवाडी अध्यक्ष श्री कैलास मुंढे साईलीला ऑटो युनियन अध्यक्ष राहुल जुमडे साईबाबा ऑटो युनियन अध्यक्ष दीपक राजूरकर अरुण फुके अंजलीताई गायकवाड (कॉंसलिट ग्रामीण रुग्णालय )सुधाकर निखाडे, गिरीधर शेजुळ,विद्या काष्ठे,वंदना जमदाडे,मालता अंभोरे यांचा सहभाग केले . रॅलीमध्ये 30 पेक्षा अधिक ऑटो रिक्षा 4 अंबोलस 300 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग रॅलीत सहभाग घेतला.या रॅलीचे सुरवात पोलीस स्थेशन पासून सुरवात करण्यात आली तर वाशिम नाका,लोणी फाटा,भाजी मार्केट,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,सराफ लाईन आसन गल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप झाला . महाविदयालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागाने आयोजन करण्यात आले . एचआयव्ही / एडस या माहितीचे हस्तपत्रकांचा व एचआयव्ही प्रतिबंधक निरोध वाटप करण्यात आले.
प्रतिकिया :-1 डिसेंबर पासून एड्स हा दिवस पाळला जातो जगभर फैलावलेल्या एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमनाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी व एड्स ग्रस्त रुग्ण हे सुद्धा आपल्या सारखे आयुष्य जगू शकतात त्यांचे मनोपाठबळ वाढवावे या करिता दर वर्षी एड्स जनजागृती रॅलीचे नियेजन करण्यात येते. *अंजली गायकवाड(कॉन्सलिट ग्रामीण रुग्णालय रिसोड )*