औरंगाबाद:- (दीपक परेराव)आज छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)येथे जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांची बैठक मोठ्या संख्येत पार पडली. यावेळेस महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अमानकारक वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. आपल्या अस्मितेचा अवमान करणाऱ्या या महाराष्ट्रद्रोही राज्यपालाची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी एकमुखाने झाली.
त्यानुसार "राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव" हे साप्ताहिक आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. ज्यामध्ये दररोज विविध पक्षांच्या पुढार्यांच्या घरासमोर जाऊन जाब विचारण्यात येईल.
याची सुरुवात उद्या दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर सर्व शिवभक्त ढोल वाजवून करण्यात येणार आहे. मंत्री महोदयांना जाब विचारणार आहेत की, राज्यपालाने शिवरायांचा केलेल्या अवमानाची माहिती आपणास आहे का ?असल्यास आपण राज्यपाल हटावची मागणी केली आहे का ?
तमाम शिवभक्तांना उद्या सकाळी ९ वाजता मोर मॉल, शहानुर मिया दर्गा येथील अतुल सावे यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने जमा होण्याचे आवाहन विनोद पाटील यांनी केले आहे.