झाडांच्या संगोपनाचा निसर्ग मित्रांने घेतला ध्यास व पुढाकारकन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील निसर्ग मित्र देविदास थोरात यांनी आपले गावच आपले तीर्थक्षेत्र समजून गावातील केंद्रीय प्राथमिक शाळा, जि प प्रशाला, शाळेसमोरील परिसर, मारुती मंदिर परिसर स्मशानभूमी परिसर भिकनशावली बाबा परिसर , शासकीय ठिकाणी, धार्मिक , सार्वजनिक ठिकाणी, वृक्षारोपण केलेल्या सर्व लहान व मोठ्या वृक्षांच्या संगोपनासाठी पर्यावरणाच्या संतुलनासाठी, पशुपक्ष्यांचे अस्तित्व टिकून राहावे, या उद्देशाने फळझाडे फुलझाडे वृक्षारोपण केलेले आहे. या झाडांच्या संगोपनासाठी जवळपास शुक्रवार रोजी 110 झाडांच्या खोडांना कीड लागू नये यासाठी गेरू, चुना, औषधी स्वखर्चाने आपला अमूल्य वेळ देऊन, श्रमदान करून , वृक्ष लागवड व संगोपनाचे महान कार्य करत आहे. झाड तेथे पाखरू धरती मातेचे लेकरू हा विचार समोर ठेवून, तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांनी सांगितलेल्या या झाडाच्या महत्व प्रमाणे हा अवलिया निसर्ग मित्र कार्य करत आहे.