मुंबई: घरातील वडीलधारी मंडळी काबाडकष्ट करतात तेव्हा त्यांची काळजी घ्यायला मुल कायमच पुढे सरसावतात. कामाच्या ओझ्याने दमलेल्या पुरुषाची काळजी घेण्यासाठी त्याची पत्नी कायमच अग्रणी असते.पण त्यासोबत, लेक आणि बापाचं नातं हे काही औरच असत.
एका मुलीचे वडील दुकानात कामामुळे थकून झोपी गेलेले असतात. त्यावेळी त्याची चिमुरडी लेक तेथे येते आणि एक गोष्ट करते. वडिलांची झोपमोड होऊ नये म्हणून लेक ती कृती करुन निघून जाते. पण जेव्हा वडील उठतात आणि लेकीचं प्रेम पाहून अक्षरश: लहान मुलासारखे ढसाढसा रडू लागतात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की वांग नावाचा एक व्यक्ती एका रेस्टॉरंटमध्ये त्याच्या दुकानात टेबलावर डोके ठेवून झोपलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या काळात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता. तेव्हापासून तो आपल्या कुटुंबासाठी खूप चिंतेत होता. इंस्टाग्रामवर पीपल नावाच्या अकाउंटने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या हृदयस्पर्शी व्हिडिओमध्ये, वांग त्याच्या रेस्टॉरंटमध्ये विश्रांती घेताना दिसत आहे. जेव्हा तो झोपतो तेव्हा त्याची लहान मुलगी त्याच्या मागे येते आणि तिचे लहानसे जॅकेट त्याच्या अंगावर घालून निघून जाते.
काही काळानंतर, वांगला कळते की लेकीने तिच्या वडिलांच्या खांद्यावर जॅकेट घातले आणि ती निघून गेली. वडिलांना मदत करण्यासाठी त्याच्या मुलीने उचललेले छोटेसे पाऊल त्याच्या हृदयाला भिडते. सगळ्यांसाठी खंबीरपणे उभा राहणारा बाप अक्षरश: लहान मुलासारखा ढसाढसा रडू लागतो.